ज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर
हवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......